

वर्धा : शहरातील सिव्हिल लाईन परिसरात पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जाजूवाडी परिसरातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत राहत असलेल्या दिनेश झोले यांच्या घराबाहेर ठेवून असलेली सायकल चोरट्यानी चोरून नेल्याची घटना (ता. १०) बुधवारी सकाळी उघडकीस आली.
घटेची तक्रार त्यांनी शहर पोलीस स्टेशन मध्ये दिली गेल्या काही महिन्यांपासून मुख्य रस्त्या लगत असलेल्या शासकीय वसाहतीतून घरासमोर असलेल्या सायकलची चोरी, उभ्या दुचाकीतून पेट्रोल काढून नेने, वाहनाचे पार्ट काढून चोरी करण्याच्या घटना सातत्याने वाढल्या आहे. याकडे स्थानिक पोलिसांनी लक्ष देऊन या परिसरात रात्रीची गस्त वाढवावी अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.