
वर्धा : निर्जनस्थळी नेत १३ वर्षीय अल्पवयीन मुलावर १६ वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, पीडित मुलाच्या वडिलांनी याबाबत शहर ठाण्यात तक्रार दिली आहे. १३ वर्षीय मुलगा हा दुपारच्या सुमारास शेळ्या चारण्यासाठी शेतात गेला असता त्याच्याच मोहल्ल्यात राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलाने अडविले. बळजबरीने त्याला शेतालगतच्या एका तिर्जनस्थळी नेत त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला.
ही घटना ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ५ वाजेच्या सुमारास घडली होती. बालकाने त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करीत तेथून घराकडे धाव घेतली. मात्र, तेव्हापासून पीडित बालक हा एकटा राहत होता. कुणाशीही बोलत नव्हता. नेहमी बोलण्यास भीत होता. यामुळे त्याच्या वडिलांनी त्याची विचारपूस केली असता त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. वडिलांनी लगेच शहर पोलिसांत धाव घेत याबाबतची तक्रार दिली. पुढील तपास शहर ठाण्याचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी करीत आहे.

















































