Home ◼️ संपादकीय अवैध विदेशी दारू वाहतूक करणारे दोघे जेरबंद ; ७ लाखांहून अधिक मुद्देमाल...

अवैध विदेशी दारू वाहतूक करणारे दोघे जेरबंद ; ७ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

वर्धा : वर्धा शहर गुन्हे प्रगटीकरण पथकाने अवैध विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करत मोठी कारवाई केली असून तब्बल ७ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू वाहतुकीवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वर्धा शहर पोलिस स्टेशनच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने ही कारवाई केली. नाकाबंदी दरम्यान संशयित वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन न थांबवता पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून वाहन ताब्यात घेतले. या कारवाईत नौशाद शाह रझ्जाक शाह व राकेश गंगाधर चतारे (दोन्ही रा. इंदिरानगर, आरवी नाका, वर्धा) यांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणात विदेशी दारू जप्त करण्यात आली. यात विविध कंपन्यांच्या बाटल्यांचा समावेश असून एकूण ७,०९,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये चारचाकी वाहन, मोबाईल फोन आणि दारूच्या बाटल्यांचा समावेश आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस निरीक्षक श्री. संतोष ताले, प्रभारी पो.नि. श्री. अजय मुरसरी यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक शरद गायकवाड व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली. पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून अवैध दारू तस्करीच्या जाळ्याचा अधिक तपास केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!