अखेर दोन महिन्यापासुन सुरू असलेली मृत्यूशी झूंज थांबली; ब्लड कॅन्सरच्या आजाराने यूवकाचा मृत्यू! गावात हळहळ


पवनार : येथील यूवक प्रफुल कांबळे (वय ३०) वर्षे रा. पंचशिल वार्ड पवनार याचा ब्लड कॅन्सरच्या आजाराने सेवाग्राम येथील कस्तूरबा रुग्णालयात (बुधवार ता. २८) दुपारी २.३० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाले.

गेल्या २ महिन्यापासून तो ब्लड कॅन्सर या आजाराशी झुंज देत होता. घरचा करता पुरुष असल्याने त्याने आजाराने खचून न जाता आपले कुटूंब सांभाळत होता. शेवटी आज दुपारी २.३० वाजता सेवाग्राम येथील कस्तूरबा रुग्णालयात उपचारादरम्यान त्याची मृत्यूची झुंज थांबली आणि त्याचा मृत्यू झाला.

त्याला पत्नी, एक छोटा मुलगा आहे. त्याच्या या आकस्मात जाण्याने त्याचे कुटूंब उघड्यावर पडले. कुटूंबावर दुख्खाचा डोंगर कोसळलेला आहे. या घटनेने पवनार परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here