

हिंगणघाट : 17 व 18 जुलैला झालेल्या अतिवृष्टिमुळे परिसरातील वणा, यशोदा, वर्धा, धाम, बोर या नद्यांना महापूर आला. या महापुरामुळे हजारो कुटुंब बाधित झाले. अशा 1448 कुटुंबांना तात्पुरता दिलासा मिळावा याकरिता आमदार समीर कुणावार यांनी केलेल्या पाठपुराव्यातून प्रत्येकी 5 हजार रुपये मिळाले आहे. ही रक्कम पूरपीडित कुटुंबांच्या बँक खात्यात जमा झाली.
या पुरात टोंगळाभर ते कमरेपर्यंत पाण्यामध्ये घराघरात पाणी शिरले यामध्ये घरात होते नव्हते, ते संपूर्ण पाण्याच्या प्रवाहात गेले. आ. कुणावार यांनी 20 जुल रात्री 11 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयात सर्व खातेप्रमुखांची तत्काळ बैठक बोलवली. या बैठकीत पूरबाधित लोकांच्या घराचे पंचनामे करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या संपर्ण घरांचे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून शासनातर्फे मिळणारी मदत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या सूचना तहसीलदार सतीश मासाळ यांना केल्या. उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार सतीश मासाळ, मुख्याधिकारी भगत, गटविकास अधिकारी मोहोड, नायब तहसीलदार पवार, पठाण, नासरे, माळवे, प्रवीण काळे, ब्राह्मणकर, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी मदत करण्यात कुठलाच कसर सोडला नाही.