

पवनार : विनोबाजींच्या विचारांनी प्रेरित स्त्रीशक्तीच्या संकल्पनेला समाजात खरा आकार देण्यासाठी विनोबा विचार प्रवाह परिवाराने मार्च २०२३ मध्ये नंदिनी लोकमित्र शिबिर सुरू केले. या शिबीराची सांगता येथील ब्रम्हविद्या मंदिरात होणार आहे. या शिबीरात प्रवचण, मार्गदर्शन, चर्चासत्र तथा विचारांची आदान-प्रदाण होत आहे. या निमित्याने देशभरातून शेकडो भगीनी पवनार येथील ब्रम्हविद्या मंदिरात दाखल झालेल्या आहे. शनिवार ता. ६, ७ आणि ८ या तिन दिवस सकाळी ९ वाजल्यापासून या शिबीराची सुरुवात होणार आहे.
पूर्व काळापासून स्त्री शक्तीला मोठे स्थान दिले होते मात्र कालांतराने स्त्रीयांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले. त्यांची आजही वाताहत सुरुच आहे. त्यांना समाजात मानाचे स्थान मिळण्याकरीता आजही धडपड करावी लागते. त्यांच्या सक्षमीकरणाकरीता या शिबीराच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे. जगात सगळीकडे हिंसेचे वातावरण आहे. अहिंसेचे यूग यायचे असेल तर महिलांचे सक्षमिकरण करणे गरजेचे आहे या हेतून शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
नंदिनी लोकमित्र शिबिरा’चे देशभरात आतापर्यंत १५ राज्यांमध्ये आयोजन करण्यात आले होते. तेथील स्थानिक महिलांच्या पुढाकारातून या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात जेष्ठ विनोबा विचारक रमेशभाई (शहाजापूर), संजय राय (दिल्ली), जयेशभाई ब्रम्हविद्या मंदिरचे गौतम बजाज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शुभांगी हिवरे, प्रची बहन, ज्योती बहन या कार्यक्रमाचे नियोजण करीत आहे.