कपाशीवरील बोंडसडीचे एकात्मिक व्यवस्थापन

वर्धा : सततचा पाऊस, ढगाळ वातावरण व तापमानातील यामुळे कापुस या पिकावर बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्यास्थितीत कापूस पिक पात्या व बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत किडीमुळे बोंडांना इजा झाल्यानंतर पर्यावरणीय परिस्थितीवर बोंडसड रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बोंडसडीचे एकात्मिक व्यवस्थापक करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पावसामुळे शेतातील वाढलेली आद्रता व घटलेले तापमान यामुळे कापूस पिकावर जिवाणूजन्य रोगामुळे आंतरिक व बाह्य बोंडसड दिसून येतो. वातावरणातील सापेक्ष आद्रता ९० ते १०० टक्के असणे, वारंवार पडणारा हलका पाऊस व ढगाळ वातावरण तसेच किडीमुळे बोंडाना झालेली ईजा व रोगग्रस्त बोंडावर कमी प्राणवायू अवस्थेत तग धरणारे जिवाणू आणि काही प्रमाणात रोगकारक दुय्यम बुरशीचा प्रादुर्भाव बोंडसड रोगास अनुकूल ठरतो. बोंडसळ दोन प्रकारची आढळते. त्यात बाह्य बोंडसळ बहुतेक वेळा बोंडाच्या पृष्ठभागावर बुरशीची वाढ झाल्याचे दिसते. अंतर्गत बोंडसश बोंडे बाहेरून निरोगी दिसत असली तरी फोडली असता आतील रुई पिवळसर गुलाबी ते लाल तपकिरी रंगाची होऊन सोडल्याचे दिसते बऱ्याच वेळा सारखे सुद्धा सोडते.

यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळावा, शेतात साचलेले अतिरिक्त पाणी लगेच शेताबाहेर काढावे पाणी शेतात साचून राहू देऊ नये तसेच अति प्रमाणात सिंचन करू नये, पात्या, फुले व बोंडवाढीच्या अवस्थेत किडीमुळे बोंडास होणारी ईजा टाळण्याकरता रस शोषण किडी, सुरुवातीच्या अवस्थेतील बोंडअळ्या व इतर किडीच्या शिफारशीत कीटकनाशकाद्वारे वेळीच बंदोबस्त करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here