१८ तासात दोघांची हत्या! पहिल्या गुन्ह्यात तीन भावांसह वडीलही आरोपी

नागपूर : जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या १८ तासात हत्येचे दोन गुन्हे घडले. पहिली घटना गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास रिपब्लिकन नगरात, तर दुसरी घटना शुक्रवारी दुपारी वसनशहा चौकाजवळ घडली. यामुळे जरीपटक्यात थरार निर्माण झाला आहे.

जरीपटक्यातील रिपब्लिकन नगरात राहणारा रोहित किसनाजी वाघमारे (वय २५) आणि त्याचा चुलत भाऊ पियुष किशोर भैसारे (२४, रा.लष्करीबाग) हे दोघे गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास जात असताना, त्यांना रिपब्लिकन नगरातच राहणारे देवीदास जेठाजी जांभूळकर (६०), तसेच त्यांची मुले हर्षद (32), भूपेंद्र (33) आणि शैलेंद्र (२६) यांनी रोखले. जुन्या भांडणाचा विषय काढून जांभूळकर बाॉप-लेकांनी वाघमारे आणि भैसारेला मारहाण केली. ते आपल्या साथीदारांना फोन करून बोलावत असल्यामुळे संतप्त झालेल्या आरोपी शैलेंद्र जांभूळकरने वाघमारेवर चाकूहल्ला चढवला. त्याच्या मदतीला धावलेल्या भैसारेवर देवीदास जांभूळकरने लोखंडी सळाखीने हल्ला चढवला.

या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. माहिती कळताच जरीपटका पोलीस घटनास्थळी धावले. तोवर आजुबाजूच्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. पण तेथे डॉक्टरांनी वाघमारेला मृत घोषित केले. पोलिसांनी भैसारेच्या जबाबावरून आरोपी जांभूळकर बाप-लेकांना अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर करून त्यांचा ६ एप्रिलपर्यंत ‘पीसीआर मिळवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here