भरधाव कारने चिरडले रोह्याला! कारचे मोठे नुकसान

भिडी : वर्धेकडून यवतमाळच्या दिशेने भरधाव कारने रस्ता ओलांडत असलेल्या रोह्याला धडक दिली. यात रोह्याचा जागीच मृत्यू झाला. शिवाय कारचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास झाला. एमएच. ४९ ए. एस. ०२८१ क्रमांकाची कार वर्धेकडून यवतमाळच्या दिशेने जात होती. भरधाव कार भिड लिठारात येताच कारने जबर धडक दिली. यात रोह्याचा जागीच मृत्यू झाला. तर कारच्या पुढील भाग चपकल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात होताच कार चालकाने वाहनावर वेळीच नियंत्रण मिळवीत ती रस्त्याच्या कडेला उभी केल्याने कारमधील प्रवासी थोडक्यात बचावले अपघाताची माहीती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या अपघाताची नोंद देवळी पोलिसांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here