ट्रॅक्टर, कारच्या धडकेत चार गंभीर! जखमींवर सेवाग्राममध्ये उपचार; कान्हापूर शिवारातील अपघात

सेलू : वर्धेकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरला मागाहून भरधाव येणाऱ्या कारने ओव्हरटेक करण्याच्या नादात जबर धडक दिली. यात कारमधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान वर्धा-नागपूर महामार्गावरील कान्हापूर शिवारातील पेट्रोलपंपाजवळ झाला.

सालोड (हिरपूर) येथील शेख अब्दुल शेख यांच्या मालकीचा एम.एच.३२, ए. एच. ९३७१ क्रमांकाचा ट्रॅक्‍टर सेलू येथून वर्धेकडे जात होता. यादरम्यान नागपूरकडून येणाऱ्या एम.एच. ४२ ए.एस. ५७३४ क्रमांकाच्या कार चालकाने ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रॅक्‍टरला मागाहून जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहने पलटी झाली. कारमधील दोन महिला, एक मुलगी व कारचालक गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे जखमींची नावे कळू शकली नाहीत. यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. सेलू पोलिसांनी माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र कोहळे, नितीन नलावडे, ज्ञानेश्‍वर खैरकार यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास सेलू पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here