भाजीमंडीत आलू १४ रुपये, तर घराजवळ २५ रुपये किलो! किती ही लुट; भावबाजीत शेतमाल उत्पादक शेतकरी मात्र उपेक्षित: व्यापारी, अडत्यांची चांदीच चांदी

चिकणी (जामणी) : प्रत्येक शहरात होलसेल दरांत भाजीपाला मिळण्याचे एक ठिकाण असते. तर ग्रामीण भागासाठी तालुक्याच्या ठिकाणी भाजीमंडी असते, या ठिकाणी असलेला भाजीपाला दर आणि बाहेर रिटेलमध्ये असलेला दर यामध्ये कमालीची तफावत असल्याचे दिसून येते.

जवळपास दिडी दुपटीचा फरक असते, तर शेतकऱ्यांचा भाजीपाला याहीपेक्षा कपी दरात खरेदी केला जातो, केव्हा केव्हा तर शेतकऱ्यांच्या भाजीपाला तोडणीचाही खर्च निघत नाही; पण व्यापारी व चिल्लर विक्रेत्यांची मात्र चंगळ असते, हल्ली पावसाळा सुरू असल्याने भाजीपाल्याचे उत्पादन कमी प्रमाणात असते व मागणी अधिक असते, यामुळे हल्ली भाजीपाल्याच्या किमतीत तेजी असल्याचे दिसून येते, तसेच पावसाळ्यात भाजीपाला खराब होण्याची जास्त शक्यता असते; पण याचा परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवर होतो.

पिकवतात शेतकरी, जास्तीचा पैसा तिसर्‍याच्याच हातात !

शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यासाठी शेतात अहोरात्र कष्ट करतात, रात्रीचा दिवस करते कोणत्याही नेंसर्गिक आपत्तीची तमा न बाळगता शेतकरी शेतात राबत असतो; पण त्याने केलेल्या कष्टाच्या कमाइचा मलिदा तिसर्‍याच्याच पदरी पडते, केव्हा केव्हा तर शेतकयांना भाजीमंडीतून भाजीपाला विकून रिकाम्या हाताने परतावे लागते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here