हिंगणघाट पोलिसांनी ठोकल्या चोरट्यांना बेड्या

हिंगणघाट : स्थानिक पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दुचाकी चोरट्यांना अटक केली आहे. या चोरट्यांकडून चोरीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

दुचाकी चोरी झाल्याची तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत तपासाला गती दिली. दरम्यान, पोलिसांनी खात्रीदायक माहितीच्या आधारे शेख मोहसीन शेख सलीम (२५, रा.हिंगणघाट) व इस्त्राईल उर्फ शाहीद रसूल खान पठाण (२४, रा. समुद्रपूर) यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली.

या चोरट्यांनी दोन दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्यातील एक गुन्हा समुद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहे. चोरट्यांकडून चोरीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई हिंगणघाटचे ठाणेदार संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात शेखर डोंगरे, नीलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर यांनी केली. गेल्या काही दिवसांपासून हिंगणघाटसह जिल्ह्यात इतरही ठिकाणी दुचारी चोरीच्या घटना वाढल्याने यातून काही हाती लागते का? याचा तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here