कार-दुचाकीचा अपघात! बहीण-भाऊ अन्‌ दोघे चिमुकले गंभीर

रोहणा : भरधाव असलेल्या कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील बहीण-भाऊ तसेच दोन चिमुकले गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास नजीकच्या सोरटा येथील बसस्थानकासमोर घडला. या अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली आहे. दुचाकीवरील चौघे कपडे खरेदीसाठी पुलगावला जात होते. दरम्यान हा अपघात घडला.

रोहना येथील रहिवासी असलेला प्रशांत बबन पाचंगे, माहेरी आलेली प्रशांतची बहीण सारिका रवनकर (पाचंगे), तसेच सारिकाची मुलगी सर्वश्री (५) व मुलगा पार्थ (४) हे एमएच ३२ वाय १८०८ क्रमांकाच्या दुचाकीवरून कपडे खरेदीसाठी पुलगावच्या दिशेने जात होते. त्यांची दुचाकी आर्वी-पुलगाव मार्गावरील सोरटा बसस्थानक परिसरात येताच समोरून येणाऱ्या एमएच ३२ ए. ई. ०६७६ क्रमांकाच्या कारने दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकीवरील चौघेही गंभीर जखमी झाले. अपघात घडल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना तातडीने सेवाग्राम येथील रुण्णालयाकडे रवाना केले. अपघाताची माहिती मिळताच पुलगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here