दारूची अवैध वाहतूक करणारे दोघे जेरबंद! 5.64 लाखांचा मुद्देमाल जप्त

अल्लीपूर : अल्लीपूर पोलिस ठाणे हद्दीत दारूबंदी कायद्यान्वये छापा टाकून चारचाकी गाडीसह आरोपींच्या ताब्यातून 5 लाख 64 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई अल्लीपूर पोलिसांच्या वतीने करण्यात आली आहे.

हेमंत राऊत (33) व कैलास वडतकर (33) दोन्ही रा. सोनेगांव (रुईकर) ता. कळंब जि. यवतमाळ असे आरोपींचे नाव आहे. आरोपींच्या ताब्यातून कार क्रमांक एम. एच. 31 ई. ए. 1336 9 खड्यांच्या खोक्यामध्ये देशी दारूच्या 80 एमएलच्या प्रत्येकी 48 शिश्याप्रमाणे एकूण 432 सीलबंद शिश्या प्रति 150 रुपयांप्रमाणे 64 लाख 800 रुपये असा एकून किंमत 5 लाख 64 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here