
वर्धा : दुचाकी चोरुन नेणाऱ्या अट्टल चोरट्यास अवघ्या दोन तासांच्या आता पोलिसांनी पकडून कोठडीत डांबला. प्रेम कन्नाके (२६ रा. इंझापूर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. विनोद बाबूजी शेंडे, रा.मांडवगड, याची दुचाकी इंझापूर ग्रामपंचायतीच्या समोरून चोरी गेली होती. याप्रकरणाची तक्रार सावंगी पोलिसात दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास यंत्रणा लावली असता एक व्यक्ती सावंगी येथील अभियंता महाविद्यालय परिसरात संशयीतरीत्या दुचाकी घेऊन फिरत असल्याचे समजले.
पोलिसांनी शोध घेत त्यास ताब्यात घेत खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून एमएच. ३२ एन. ६६३१ क्रमांकाची दुचाकी हस्तगत केली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेर्वर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक पंकज वाघोडे, संजय पंचभाई, विरेंद्र कांबळे, अनिल वैद्य, निखिल फुटाणे, हर्षवर्धन पून, अमोल जाधव यांनी केली.




























































