कैंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचे आश्‍वासन! उमेद कर्मचाऱ्यांना काम मिळावे यासाठी निधी देणार

वर्धा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती कर्मचारी संघटना वर्धा जिल्ह्याच्यावतीने केंद्र शासनाने महिलांना आत्मनिर्भर करणाऱ्या उमेद वर्धींनींना नियमित काम मिळावे, यासाठी केंद्र सरकारने निधी द्यावा, यासाठी खासदार रामदास तडस यांना मागण्यांचे निवेदन आयटक राज्य उपाध्यक्ष दिलीप उटाणे, जिल्हा सहसचिव सुरेश गोसावी, किरण मंदेले, साधना झपाटे, रत्ना भेंडे, जयश्री लोहवे, शशिकला नेरकर, सुकेश जुनघरे यांच्या नेतृत्वात देण्यात आले होते.

महिलांना आत्मनिर्भर करणाऱ्या वर्धींनींना नियमित काम मिळावे, यासाठी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंग यांना पत्र देऊन निधी देण्यात यावा, अशी मागणी खा. रामदास तडस यांनी पत्राद्वारे केली होती. खासदार रामदास तडस यांनी दिलेल्या पत्रावर केंद्रीय ग्रामविकास विभागाकडून उत्तर आले असून, लवकरच निधी देण्यात येणार व इतर मागण्यांसाठी संघटनेच्या प्रतिनिधीसोबत बैठक घेण्यात येईल, असे मंत्री गिरीराज सिंग यांनी सांगितले. महाराष्ट्रा विविध जिल्ह्यातील गावागावात जावून महिला बचत गट तयार करण्यासाठी त्या महिलांचा सामाजिक, आर्थिक, गुणवत्ता वाढविण्यासाठी म्हणजेच महिलांना आत्मनिर्भर करण्याचे वर्धीनी मागील १५ वर्षांपासून काम करतात.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत वर्धा जिल्हा पायलट जिल्हा म्हणून काम करत आहे; परंतु राज्यातील अनेक जिल्ह्यात वर्धीनी सेल निर्माण झाल्यामुळे रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. वर्षातून फक्त तीन ते चार महिनेच (काम) गावफेरी दिली जाते. या अभियानासाठी केंद्र सरकार निघी देतो. तो निधी फार कमी आहे. केंद्र सरकारने महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी भरीव निधी दिल्यास व निधी देताना वर्धींनींना १२ महिने नियमित काम मिळेल, यासाठी आपण संघटना प्रतिनिधींना बैठकीला दिल्ली येथे घेऊन जाणार असल्याचे लोकसभेचे खासदार रामदास तडस यांनी सांगितले.

खासदार रामदास तडस यांचे आभार आयटक राज्य उपाध्यक्ष दिलीप उटाणे, रश्मी पठाण, सुवर्णा नगराळे, भावना लोहवे, रंजना रामटेके, वैशाली गुजरकर साधना सरदार, ज्योती देशमुख, सविता वानकर, योजना चैधरी, कल्पना नायटे, वनिता सावरकर, कल्पना कातकुरे, शैलेजा आटे, संध्या उघडे, रजनी येवतकर, शुभांगी चुनारकर मयुरी पाटील, सिंधू वरघने, भारती उमाटे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here