वादातून फोडल्या चारचाकीच्या काचा

वर्धा : विनाकारण वाद करीत व्यक्तीच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून चारचाकीच्या काचा फोडून व्यक्तीचे नुकसान केले. विक्रमशीला नगर परिसरात ही घटना घडली. बाबा विठोबा भगत हे घरी असताना प्रणय उर्फ टिन्या घुसे (रा.थूल लेआउट) याने बाबा भगत याच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करीत चारचाकीच्या समोरील काचा विटेने फोडून २५ हजार रुपयांचे नुकसान केले. या प्रकरणी रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here