

वर्धा : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी लैंगिक अत्याचार केल्याची घटना देवळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली, पीडितेस गर्भधारणा झाल्याने हा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी देवळी पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पीडिता ही शिकवणीसाठी घराबाहेर निघत होती. दरम्यान तिची मैत्री विक्की नामक युवकाशी झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. विक्कीने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार पीडितेवर अत्याचार केला. पीडितेची प्रकृती बिघडल्याने घरच्यांनी तिला सावंगी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता पीडिता हिला गर्भधारणा झाल्याचे उघड झाले, अखेर पीडितेने सर्व माहिती घरच्यासमोर कथन केल्यावर घरच्यांच्या तक्रारीवरुन देवळी पोलिसात विक्की नामक युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.