दुचाकी चारचाकीला धडकली! दुचाकीचालकाविरुदध हिंगणघाट ठाण्यात गुन्हा दाखल

वर्धा : मद्यप्राशन करून दुचाकी चालकाने दुचाकी क्रमांक एम. एच. 27 ऐ. जे. 2019 भरधाव वेगाने चालवून चारचाकी गाडी क्र. एम.एच. 32 ऐ.एच. 4137 ला जाऊन धडकला. ही घटना 9 डिसेंबर रोजी सांयकाळी 6.30 वाजता नागपूर-हैदराबाद रोडवरील कवडघाट शिवारात घडली. यात दुचाकीचालक चंद्रकांत ज्ञानेश्‍वर पिचके (वय 38) रा. रसुलबाद हा जखमी झाला आहे. या अपघातात दुचाकी व चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी दुचाकीचालकाविरुदध हिंगणघाट ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here