अवैध उत्खनन! वर्धा वन विभागाची धडक कारवाई

वडनेर : मानकापूर येथे अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्या आधारे वन विभागाच्या पथकाने छापा टाकून उत्खननासाठी वापरला जात असलेला पोकलॅन्ड जप्त केला. या कारवाईमुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

मौजा मानकापूर शिवारातील सर्व्ह क्रमांक २८१ मध्ये शासकीय नियमांना बगल देत पोकलॅन्डच्या सहाय्याने उत्खनन केले जात असल्याची माहिती उपवनसंरक्षक शेपट यांना मिळाली. त्यानंतर वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश खेडकर यांच्या मार्गदर्शनात वन विभागाचे एस. ए. कापकर, ए. एस. पिसे, यू. एल. पवार यांनी घटनास्थळ गाठून पोकलॅन्डचालक दीपसिंग दशरथ परते ह. मु .हिंगणघाट याला ताब्यात घेत त्याच्याजवळून पोकलॅन्ड जप्त केला. शिवाय त्याच्याविरुद्ध वन गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here