दुचाकीवर धडकली कार; १ ठार, २ गंभीर जखमी

वडनेर : दुचाकीत इंधन भरल्यानंतर रस्ता ओलांडत असलेल्या दुचाकीला भरधाव कारने धडक दिली. यात दुचाकीवरील दोघे युवक गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सायंकाळी उशिरा नागपूर-हैदराबाद मार्गावर दारोडा शिवारात घडला. आजनसरा येथील क्रिष्णा लाडेकर आणि भोजराज बोंद्रे हे दोन तरुण हिंगणघाट येथे मोबाईल खरेदी करण्यासाठी एम. एच. ३२ एल. ५५७६ क्रमांकाच्या दुचाकीने घराबाहेर पडले. दुचाकीत इंधन भरल्यानंतर ते रस्ता ओलांडत असताना भरधाव असलेल्या टी. एस. ०९ आर. ७८३६ क्रमांकाच्या कारने त्यांना जबर धडक दिली. यात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. बुधवारी पहाटे उपचारादरम्यान भोजराज याचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here