मुख्याध्यापक मधुकर बोरुटकर राज्यस्तरीय गुणवंत पुरस्काराने सन्मानित

हिंगणघाट : शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दरवर्षी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई राज्यातील शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करीत असते यंदा हा पुरस्कार भारत दिनांत विद्यालय हिंगणघाट चे मुख्याध्यापक मधुकर बोरुटकर यांना शिक्षक दिनी आभासी पद्धतीने वितरीत करुन सन्मानीत करण्यात आले.
त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रोग्रेशीव सोसायटी हिंगणघाटचे अध्यक्ष गो. गो. राठी, शाम भिमनवार, सचिव‌ रमेश धारकर, प्रमोद हंबर्डे, प्रमोद हिवाळे, नरेश चव्हान, हितेश‌ मुडीया, सलीम कुरेशी, कपील जाधव‌, प्रशांत चौधरी, नितीन कठाने, भिमराव सातपुडके, यशवंत बालपांडे, देवयानी बोरुटकर आदींनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here