भरधाव ट्रकच्या धडकेत वयोवृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू!

तळेगाव (श्या.पंत.) : प्रात:विधीसाठी गेलेल्या वयोवृद्धाला भरधाव ट्रकने धडक दिली. यात वयोवृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर-अमरावती महामार्गावरील टी-पॉर्डट परिसरात सोमवारी सकाळी ७.3० वाजताच्या सुमारास घडली. माणिक महाजन वरखडे (वय ७५, रा. जुनी वस्ती तळेगांव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, हरीसिंग नेनोसिंग चव्हाण हा जी.जे. २७ एक्स, ८५६१ क्रमांकाच्या ट्रकमध्ये लोखंडीसाहित्य घेऊन नागपूरकडून अमरावतीच्या दिशेने जात होता. भरधाव ट्रक आष्टी टि-पॉर्डंट परिसरात आला असता रस्ता ओलांडणाऱ्या माणिकला ट्रकने धडक दिली. भरधाव ट्रक इतका सुसाट होता की, धडकेनंतर माणिक यांना ट्रकने काही अंतरापर्यंत फरपटत नेले.

या अपघातात माणिक यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती तळेगाव पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला, या घटनेची नोंद तळेगाव पोलिसांनी घेतली असून आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here