

पवनार : भगवती व्यायाम प्रसारक मंडळ अंजी व पासिंग हॉलीबॉल संघटनाद्वारा आयोजित सब ज्युनिअर राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी सुप्रिया गणेश पाटीलपैक हिची नागपूर विभागीय संघात निवड झाली. ती भरत ज्ञानमंडळ या शाळेची विद्यार्थिनी असून चैतन्य स्पोर्टिंग क्लब पवनारची खेळाडू आहे. आंजी मोठी येथे त. ७,८,९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यामध्ये सुप्रिया विभागीय संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
ही खेळाडू चैतन्य स्पोर्टिंग क्लबचे मार्गदर्शक दीपक उमाटे आणि विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनात तयार होत असून ती आपल्या यशाचे श्रेय कांचन रघाटाटे हिला देते. मंडळाचे सदस्य अनिल वाघमारे, किशोर वैद्य, मनीष ठाकरे, मुरलीधर वैद्य, शिरीष राऊत, सतीश हिंगे, धीरज नेवारे, बांगडे विद्यालयाचे श्री राऊत सर आणि ग्रामस्थांनी तिचे कौतुक केले आहे. यामध्ये प्रशांत दोंदल, भोजराज चौधरी, अनिल काळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.