चारचाकीची धडक! दुचाकीस्वार ठार

गिरड : भरधाव चारचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. धोडगाव वळण रस्त्यावर हा अपघात झाला होता. लहुदास अंबाडरे हे एम.एच.3२ यू, ५७३४ क्रमांकाच्या दुचाकीने भवानपूरकडे जात होते. दरम्यान, धोडगाव वळण रस्त्यावर समुद्रपूरकडून भरधाव येणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. यात. दुचाकीवरील लहुदास गंभीर जखमी झाले. त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गिरड पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here