अखेर त्या तरुणाचा नदीत मृतदेहच सापडला

नांदेपेरा : वणी तालुक्‍यातील भुरकी येथील वर्धा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या गणेश गजानन पेंदोरे याचा सोमवारी सकाळी १० वाजता नदीच्या पात्रात मृतदेहच आढळून आला. रविवारी गणेश पेंदोर व त्याचे तीनमित्र रविवारी दुपारी 3 वाजता पोहण्यासाठी वर्धा नदीच्या भुरकी डोहावर पोहोचले. चौघेही पोहण्यासाठी नदीत उतरले. पोहता पोहता गणेश अचानक नदीच्या पात्रात बेपत्ता झाला. त्यामुळे उर्वरित तिघांनी त्याचा शोधाशोध सुरू केला. मात्र गणेश सापडला नाही.

अखेर याबाबत गावकर्‍यांना माहिती देण्यात आली. नागरिकांनी तातडीने नदीकडे धाव घेतली. रविवारी सायंकाळपर्यंत शोधाशोध सुरू होती. मात्र गणेश सापडला नाही. सोमवारी पुन्हा सकाळपासून शोधकार्य सुरू करण्यात आले. अखेर १० वाजताच्या सुमारास नदीच्या पात्रात त्याच ठिकाणी गणेशचा मृतदेह आढळून आला. गणेशला वडील व एक बहीण आहे.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here