भरधाव रुग्णवाहिकेची दुचाकीला जबर धडक! एक जखमी; रुग्णवाहिका चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यासाठी शहरात जात असताना भरधाव रुग्णवाहिकेने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील व्यक्‍ती जखमी झाला. हा अपघात जिल्हा सामान्य रुग्णलयासमोरील रस्त्यावर झाला होता. याप्रकरणी २८ फेब्रुवारी रोजी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. राजीव जैन (रा. लक्ष्मीनगर) यांचा जीवनावश्यक वस्तू विक्रीचा व्यवसाय आहे. राजीव हे त्यांच्या स्कूटरने बजाज चौकाकडे जात असताना, शिवाजी चौकाकडून आलेल्या भरधाव रुग्णवाहिकेने त्यांना समोरुन धडक दिली. यात राजीव जैन हे गंभीर जखमी झाले. त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल केले असता, सेवाग्राम रुग्णालयात रेफर करण्यात आले. राजीव यांचा मुलगा निशांत जैन याने याबाबतची तक्रार शहर पोलिसात दिली असून, पोलिसांनी अज्ञात रुग्णवाहिका चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here