आरोपी घेऊन येणाऱ्या पोलीस वाहनाचा अपघात! ठाणेदारासह कर्मचारी किरकोळ जखमी

वर्धा : हिंगणघाट येथील गोळीबार प्रकरणातील आरोपीला चंद्रपूर येथून हिंगणघाटला आणत असताना पोलीस वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाचा अपघात झाला. यामध्ये ठाणेदार संपत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, सहायक पोलीस उपनिरीक्षक सादीक शेख, उमेश लडके यांच्यासह कर्मचाऱ्यांना किरकोळ जखमा झाल्याची माहिती आहे. हा अपघात चंद्रपूर – वरोरा नाका परिसरात रात्रीच्या सुमारास झाला.

हिंगणघाट नजीकच्या नंदोरी चौरस्त्यावर तसेच येणोरा गावात रात्रीच्या सुमारास पोलिसांवर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापैकी एक आरोपी विधीसंघर्षित असल्याने त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. तर॑ इतर दोन आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

याप्रकरणात तपास करण्यासाठी एका आरोपीला भेटण्यासाठी हिंगणघाट पोलीस चंद्रपूर येथे गेले होते. तपास संपाल्यावर पोलीस आरोपीसह वाहनातून हिंगणघाटकडे जात असतानाच चालकाचे नियंत्रण सुटल्याने पोलीस वाहनाला अपघात झाला. अपघातात वाहनाच्या समोरील काचा फुटल्या. सुदैवाने मोठा अपघात टळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here