काकु म्हणतात मला अठराशेच हवेत! काकूंच्या व्हारयल व्हिडिओने प्रौढ शिक्षणाचे वास्तव चव्हाट्यावर


प्रभाकर कोळसे

हिंगणघाट : पाचशेच्या तीन नोटा म्हणजे दीड हजार दोनशेची एक आणी शंभरची एक असे तीनसे रुपये दिले ते काय अठरासे झाले का? अशा संवादाचा एका महिलेचा व्हायरल व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या धुमाकूळ घातला आहे आणी तो बहुतांश जणांनी पाहीला पण अनेकांनी गमतीने व्हिडिओ मोठ्या प्रमाणात फारवर्डही केला आहे.
काकुंच्या या व्हायरल व्हिडीओने हिशेबाबद्दल सोशल मिडिया वर चवीने चर्चा करण्यात येत आहे. मात्र त्याची दुसरी बाजू यानंतर प्रकर्षाने जाणवते ती प्रौढ शिक्षणाचे अवस्थेची, या व्हिडीओमुळे प्रौढ शिक्षणाचे वास्तव मात्र चव्हाट्यावर आले हे नक्कीच साक्षर भारत योजनेत शंभर टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्याचै प्रौढ शिक्षण संचालनालय प्रयत्नांची पराकाष्ठा करते आहे हे खरे असले तरी या कांकुचे व्हायरल व्हिडिओने राज्यातील प्रौढ शिक्षणाची अवस्था अधोरेखित झाली आहे. हे मात्र खरे!

@ असा आहे व्हिडिओ
व्हिडिओमध्ये काकु तरुणांकडे १८०० रुपयांचा हिशोब मागत आहेत आपण अठराशे रुपये दिल्याचे तरुण सांगतोय पण काकुंना ते मान्य नाही तरुण म्हणतो मी तुम्हाला ५०० रुपयांच्या तीन नोटा म्हणजे दिड हजार रुपये आणी २०० रुपयांची एक नोट आणी १०० रुपयांची एक नोट मिळुन ३०० रुपये असे एकूण मिळुन १८०० रुपये दिलेत तरुणाने दिलेल्या नोटांचा हिशोब काकुंना मान्य आहे पण १८०० रुपये दिल्याचे मान्य नाही त्या म्हणतात मला १८०० रुपयेच हवेत.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here