

वर्धा : भुगाव येथील उत्तम गलवा कंपनीत बुधवार (ता. ३) फेब्रुवारीला ब्लास्ट फरनेस विभागात झालेल्या अपघातात ३९ मजूर भाजल्या गेले होते यातील एका कामगाराचा आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. अभिषेक भौमिक असे मृत कामगाराचे नाव आहे. बारा दिवसांपासून नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज झुज देत होता.
उत्तम गलवा कंपनीत बुधवार (ता. ३) झाले्या ब्लास्टमध्ये अभिषेक भौमिक याचाही समावेश होता. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. येथे उपचार सुरू असताना रविवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास अभिषेकची प्राणज्योत मालवली.
अभिषेक भौमिक हा मुळचा पश्चिम बंगाल भागातील वर्धमान जिल्ह्यातील रहिवासी आहे. मागील १२ दिवसांपासून अभिषेक हा मृत्यूशी झुंज देत असताना रविवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या १७ कामगारांवर नागपूर येथील ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.