तब्बल सहा वर्षानंतर ठगबाज विजय’ला ठोकल्या बेड्या

तळेगाव (इया.पंत.) : तीन खातेदारांना तब्बल साडेतेरा हजारांनी चुना लावून तब्बल सहा वर्षांपासून पोलिसांना चकमा देणाऱ्या विजय रामचंद्र उईके (33) रा. पारडी याला अटक करण्यात तळेगाव पोलिसांना यश आले आहे. त्याला पोलिसांनी यवतमाळ येथून ताब्यात घेत अटक केली आहे.

पोलीस सूत्रानुसार, विजय उईके हा २०११ ते २०१४ या काळात पारडी येथील डाक कार्यालयात डाकपाल म्हणून कार्यरत होता. याच काळात विजय याने तीन खाते धारकांच्या खात्यातून ७ हजार 3६० आणि शाखेतील सहा हजार ८७ रुपये असा एकूण १३ हजार ४१७ रुपयांची अफरातफर केली.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून विजय हा फरार होता. विजय हा यवतमाळ येथे असल्याची माहिती मिळताच तळेगावचे ठाणेदार आशिष गजभिये यांच्या मार्गदर्शनात ‘पोलीस उपनिरीक्षक पवन भांबूरकर, पोलीस शिपाई आशिष नेवारे, मनोज आसोले, रुपेश उगेमुगे यांची चमू यवतमाळ येथे रवाना झाली. त्याला पोलिसांनी यवतमाळ येथून ताब्यात घेत अटक केली आहे. या ठगबाज विजयकडून गुन्ह्याच्या संदर्भातील आणखी काही अधिकची माहिती तसेच ठोस पुरावे मिळेल अशी आशा पोलिसांना असून ते मिळविण्यासाठी तळेगाव पोलीस सध्या विशेष प्रयत्न करीत आहेत. लवकरच या प्रकरणी दोषारोप पत्र दाखल होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here