सुमोची ऑटोला धडक! दोघे गंभीर जखमी; आर्वी-तळेगाव मार्गावरील अपघात

आर्वी : टाटा सुमो आणि ऑटोची समोरासमोर धडक झाली. अपघात होताच ऑटो उलटला, तर टाटा सुमोचे समोरील चाक निखळून पडले. या अपघातात दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. जखमींना आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात गुरुवारी रात्री आर्वी-तळेगाव मार्गावरील मायबाई प्रवेशद्वारासमोर घडला.

प्राप्त माहितीनुसार, एमएच ३२ बी ७५१४ क्रमांकाचा ऑटो बसस्थानकाकडे जात असताना समोरून येणाऱ्या एमएच ३१-९१४२ क्रमांकाच्या टाटा सुमोने ऑटोला जबर धडक दिली. हा अपघात इतका भ्रीषण होता की, अपघात होताच जोराचा आवाज होत ऑटो उलटला, शिवाय टाटा सुमोचा पुढील चाक निखळून पडले.

या अपघातात दोन व्यक्ती जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळी जमलेली नागरिकांची गर्दी बाजूला करून जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयाकडे रवाना करीत खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. जखमींना रुग्णालयाकडे रवाना करण्यासाठी आमदार दादाराव केचे, नगरसेवक रामू राठी, तहसीलदार विद्यासागर चव्हाण, आदींनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here