वर्धा नाट्य-नृत्य महोत्सव सांस्कृतिक चळवळ वाढीस पोषक ठरेल – पंडित शंकरप्रसाद अग्निहोत्री

वर्धा : नाटक समाजाचे प्रतिबिंब आहे. समाजामध्ये निर्माण झालेल्या समस्या नाटकांमध्ये अधिक प्रभावीपणे मांडता येतात. वर्धा नाट्य नृत्य महोत्सव वर्धेतील सांस्कृतिक चळवळ वाढीस पोषक ठरेल असे मत पंडित शंकरप्रसादअग्निहोत्री यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

व्यक्तिमत्त्व विकास मंच, आधार महीला शक्ती संघटना, लायन्स क्लब गांधी सिटी वर्धा व नाट्यप्रतिक थेटर अकॅडमी द्वारा आयोजित वर्धा नाट्य नृत्य महोत्सवाचे आयोजन अग्निहोत्री पॉलिटेक्निक कॉलेज ऑडिटोरियम नागठाणा येथे करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक प्रकाश देवा, श्रीदेवी प्रकाश देवा, मोहन अग्रवाल, अभ्युदय मेघे, रमेश शहा, रवी कोटंबकार, डॉ. विनोद अदलखिया, अनिल नरेडी, शंकरराव गुल्हाने, संदीप चिचाटे, सुभाष खोडस्कर, पंकज सायंकार, अभिजीत श्रावणे, गणेश अतकर, प्रशांत बुरले, गंगाधर पाटील, पवन तिजारे, सतीश जगताप, दामोदर राऊत, चित्रा ठाकूर, ममता बालपांडे, सुनिता तडस, नंदा बोडसे, जीवन बांगडे, दिलीप रोकडे, आशिष पोहाणे, मनीष जगताप, गौरव ओंकार, जयंत भालेराव, किशोर पिंपळे, प्रमोद जैन ,होमेश्वर सुरजुसे, विजय बाभुळकर, प्रतीक सूर्यवंशी, प्रियंका बनकर, संजय आदमने, प्रकाश खंडार, विद्या नरेडी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे उद्घाटक प्रकाश देवा यांनी वर्धा नाट्य नृत्य महोत्सवाला शुभेच्छा दिल्या तर ज्येष्ठ समाज सेवक मोहन अग्रवाल यांनी नाट्य महोत्सवाचे आयोजन दरवर्षी व्हावे अशी सदिच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून संदीप चिचाटे यांनी नाट्यमहोत्सव नाट्यकर्मींसाठी दीपस्तंभ ठरेल असे मत व्यक्त केले.सुप्रसिद्ध गायिका सानिका बोभाटे, दिलीप रोकडे, जीवन बांगडे, दिवाकर डेहनकर यांनी सादर केलेली नांदी उपस्थितांचे मन जिंकून गेली तसेच विजय बाभुळकर, प्रियंका वनकर दिग्दर्शित आदिशक्ती नृत्य नाटिका ने महोत्सवाची सुरुवात झाली.

संदीप चिचाटे निर्मित व प्रतीक सूर्यवंशी दिग्दर्शित मित्तर या नाटकाने रसिकांना विचार करण्यास भाग पाडले. यामध्ये साक्षी हिवरे, प्रतिक सूर्यवंशी, प्रतीक मेघे, तन्वी ठोंबरे मंथन नाखले, कुमुद मधापूरे, भूषण भोयर, यश मधापुरे यांनी साकारलेल्या भूमिकेने रसिकांना मंत्रमुग्ध केले. तर आतंकवादी समस्या वर आधारित ब्रेनवॉश या नाटीकेने रसिकांच्या काळजाचा ठोका चुकविला. यामध्ये मंथन नाखले, प्रतीक सूर्यवंशी, अर्शिया बेग, दीप्ती चव्हाण, संस्कृती व माही चिचाटे, तनुश्री हिवरे, आयुष व यश मधापुरे यांनी साकारलेल्या दमदार भूमिकेने रसिकांना टाळ्या वाजवण्याचे भाग पडले.

ज्येष्ठ नाट्य कलावंत मोहन सायंकाळ व सीमा मुळे यांच्या दमदार अभिनयाने साकारलेली वांझ एक नवीन विचार समाजाला देऊन गेली. सुप्रसिद्ध विनोदी नकलाकार रमेश टिपले यांनी सादर केलेल्या लगीन घाई ने रसिकांना पोट धरून हसविले. सुप्रसिध्द नृत्यकलाकार किरण खडसे, चंद्रकांत सहारे, संस्कृती वाकडे, माधवी पवार शुभांगी भोयर व त्यांच्या ग्रुपने सादर केलेल्या नृत्याविष्काराने रसिकांना थिरकण्यास भाग पाडले. तर सुप्रसिद्ध गायक अभिजीत बुरघाटे ,मयुर पटाईत, अवंतिका हुमणे, सानिका बोभाटे यांनी सादर केलेल्या गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक प्रकाश देवा व श्रीमती प्रकाश देवा यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आशिष पोहाणे, संजीवनी पोहाणे, माधुरी तडस, यांनी नाटय महोत्सवाची काढलेली रांगोळी महोत्सवाच्या आकर्षणाचा केंद्र ठरली. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विलास नागोसे, स्मिता चिचाटे, मोहित सहारे, प्राजक्ता मुते, सारंग नेवारे, महेंद्र खडसे, मंगेश गांडोळे, नितीन हादवे, अथर्व अतकर, किशोर पिंपळे, होमेश्वर सुरजुसे, संजय आचार्य, नितीन होरे, मिलिंद मून, निलेश डंभे, यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here