देवळी शहरात सामुहीक अत्याचाराच्या विरोधात न्यायासाठी चिमुकल्यांनी पेटवल्या पणत्या! मिनल तिवारी यांचा पुढाकार

देवळी : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून उत्तर प्रदेश मधील हाथरसच्या भारतीय लेकीवर झालेल्या अमानुष हिंसाचार व बलात्काराच्या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच तिच्यावर व अधार्मिक पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यात आल्याने कुटुंबाच्या अधिकारावर तिलांजली देण्याच्या विरोधात निदर्शने करून वाल्मिकी परिवाराप्रती सद्भावना व्यक्त करण्यात आल्या देवळी येथील बोपापुर (दिघी) रोडवरील लोकमान्य टिळक चौक मध्ये कार्यक्रम घेण्यात आला.

मीनल तिवारी यांनी चौकातील चिमुकल्यांना एकत्र करून मेणबत्ती पेटवून निषेध व्यक्त करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला व राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करीत उत्तर प्रदेश मध्ये झालेल्या सामुहिक अन्यायाचा तीव्र निषेध करण्यात आला. या वेळी लोकमान्य टिळक चौकातील युवक मंडळी चिमुकले व महिला भगिनी मोठया प्रमाणात उपस्थित होत्या. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून विजय पचारे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन व संचालन मिनल तिवारी हिने केले. उपस्थितांचे स्वागत मास्क देऊन करण्यात आले व वितरणही करण्यात आले, तर लहान चिमुकले, युवा मंडळ व महिलांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here