
वर्धा : देशी-विदेशी दारूची छुप्या पद्धतीने तस्करी करताना पोलिसांनी आरोपीला रंगेहात पकडले. या कारवाईत एकूण 3 लाख 15 हजारांचा माल ,जप्त करण्यात आला. गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी रात्री नाकाबंदी करून एमएच 20 बीएन 2225 कार थांबवली. वाहनांची झडती घेतली असता कारमध्ये देशी, विदेशी दारू होती. पोलिसांनी अनिकेत गजानन वायगोकर (21) रा. कारला चौक याला अटक केली.
पोलिसांनी आरोपीकडून कारसह दारू, असा एकूण 3 लाख 14 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे ‘पीआय संजय गायकवाड यांच्या सूचनेवरून एपीआय महेंद्र इंगळे, पीएसआय अमोल लगड, बालाजी लालपालवले, पोलिस कर्मचारी हमीद शेख, नरेंद्र डहाके आदींनी केली.



















































