
वर्धा : नागपूर अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाटात सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास अमरावती कडून नागपूरला कास्टिक सोडा पावडर घेऊन जात असलेल्या ट्रकच्या कॅबिन खालच्या भागात शॉर्ट सर्किट मुळे अचानक आग लागली. चालकाच्या सतर्कतेने ट्रक थांबवून चालकाने उडी घेत.कसाबसा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. यात कोणतेही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक समोरील कॅबिनचा संपूर्ण भाग जळून खाक झाला होता.
लगेचच महामार्गलगत असलेल्या सीडीएट कंपनीतील टँकर पाणी आणून आग विझवण्यात आले. आग विझवण्यात आल्याने ट्रक मधील कास्टिक सोडा पावडरच नुकसान झाले नाही. राष्ट्रीय महामार्ग सहावर रस्त्याच्या मध्यभागी ट्रकने घेतलेल्या अचानक आग मुळे रस्त्याच्या एकतर्फी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.



















































