भरधाव ट्रकची कारला धडक! पाच जखमी; जाम-गिरड मार्गावरील धोंडगाव वळणावरील अपघात

गिरड : भरधाव ट्रकने कारला धडक दिली. यात कारमधील पाच व्यक्ती जखमी झाले असून, जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात जाम-गिरड मार्गावरील धोंडगाव वळण रस्ता परिसरात मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास झाला.

एम. एच. ०१ ए. व्ही. ७०६६ क्रमांकाची कार उमरेडच्या दिशेने जात होती. भरधाव कार जाम-गिरड मार्गावरील धोंडगाव वळण परिसरात आली असता समोरून येणाऱ्या एम. एच. ३४ बी. जी. ९२८६ क्रमांकाचा ट्रकने कारला समोरासमोर धडक दिली. यात कारच्या पुढील भाग चुराडा झाला असून, कारमधील अमीर हुसेन पठाण, हनिफ राहू शेख, अतुल नामदेव घायवान, उदय सुरेश बांगर, तेजस्वी नामदेव घायवान हे जखमी झालेत. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत सर्व जखमींना गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. मीनाक्षी गांधी व डॉ. वृषाली चव्हाण यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केल्यावर जखमींपैकी तिघांची प्रकृती नाजूक असल्याचे लक्षात येताच त्यांना पुढील उपचारासाठी सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविले. या अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here