वहिनीच्या अंगावर पाणी उडले! दिरास बेदम बदडले

समुद्रपूर : कापसाचे गाठोडे काढताना वहिनीच्या अंगावर पाणी उडाल्याने मोठ्या भावासह त्याच्या पत्नीने दिराला मारहाण करीत जखमी केले. सावरखेडा येथे ही घटना घडली. विकास कुंभारे हा कापसाचे गाठोडे जमिनीवर उतरवित असताना त्याचा पाय पाण्यात पडून खड्ड्यातील पाणी मोठ्या भावाची पत्नी नूतन हिच्या अंगावर उडाले. पाणी का उडविले? या कारणातून वाद करीत नूतन कुंभारे व चंद्रशेखर कुंभारे यांनी विकास कुंभारे याला काठीने मारहाण करीत जखमी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here