विदेही श्री संत सखूआई यांचा ९९ वा प्रगटदीन महोत्सव! श्रीक्षेत्र पळसगाव (बाई) येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

सिंदी : लगतच्या श्रीक्षेत्र पळसगाव बाई येथे विदेही संत सखूआई यांचा प्रगटदीन महोत्सव सोमवारी ता. २८ ते सोमवारी ता. ४ दरम्यान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असुन विवीध कार्यक्रमाची सप्ताहभर पर्वनी राहणार आहे. संत मेळात बहुमोलाचे स्थान प्राप्त असणार्‍या पळसगाव ची संत सखूमाउली चा ९९ वा प्रगटदिनानिमीत्य सोमवार (ता. २८) ला पहाटे ४ वाजता श्री माऊलीच्या मृर्तीची प्राणप्रतिष्ठा व श्री नवचंडी यज्ञ भागवतभुषण आनंद कुलकर्णी व पराग जोशी यांच्या हस्ते पार पडणार आहेत.

सकाळी ६ वाजता माऊलीचा मंगल अभिषेक हभप रमेश देवतळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सकाळी ९:३० वाजता हभप एकनाथ चौधरी, हभप मनोहर दांडेकर, वारकरी भजन मंडळ पळसगाव, श्री हनुमान वारकरी भजन मंडळ भोसा यांच्या हस्ते श्री चा वीणा प्रारंभ करण्यात येणार आहे. रात्री ९ वाजता संत सखूआई महीला भजन मंडळ पळसगाव खुशाल अतकरे आणि संच भजन सादर करणार आहेत.

मंगळवारी (ता. २९) ला संत सखूआई महीला भजन मंडळ सत्यभामा शेंडे आणि संचाचा भजन कार्यक्रम तर बुधवारी ता. ३० ला श्री संत अमरसती महीला भजन मंडळ सुरेश नखाते आणि संच भजन कार्यक्रम सादर करणार आहे. गुरुवारी (ता. ३१) वारकरी भजन मंडळ पळसगाव तर शुक्रवारी (ता. १) ला गुरुदेव सेवा मंडळ चे ग्रामगीता भजन मंडळ दहेगाव भजन सादर करणार आहे. शनिवारी (ता. २) गुरुदेव सेवा भजन मंडळ सिंदी रेल्वे मनोहर ईखार आणि संच भजनाचा कार्यक्रम होणार आहे. रवीवारी ता. ३ रात्री ३ ते ६ ला दरवर्षी प्रमाणे पालखी सोहळा संपन्न होणार आहे.

सोमवारी (ता. ४) सकाळी १० वाजता अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता (विणा उतरविने) होणार आहे नंतर हभप प्रमोद पानबुडे नारायणपुर यांच्या मधूर वाणीतुन गोपाल काल्याचे किर्तन तर दुपारी २ वाजता सखुमाउली चा पालखी सोहळा तर रत्नाकर देवतळे यांच्या हस्ते दही हंडी कार्यक्रम पार पडणार आहे. ४ वाजता पासुन भव्य महाप्रसाद सुरुवात होणार आहे. रात्री ८ वाजता वाशीम येथील दिव्यांग मुला-मुलीचा प्रेरणादायी संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे. मंगळवारी (ता. ५) रजधुळ आणि पाक्षाळ पुजनाचा कार्यक्रम होणार आहे. आयोजित कार्यक्रमात सखुआई च्या सर्व भावीभक्तानी उपस्थित राहुन दर्शनाचा लाभ घ्यावा तसेच सखुआईच्या मंदीर जिर्णोध्दाराला सरळ हाताने आर्थिक स्वरुपात मदत करावी आणि केलेल्या मद्दतीची प्रत्येकाने पावती घ्यावी असे आवाहन देवस्थान पंच कमेटी श्रीक्षेत्र पळसगाव बाईचे अध्यक्ष सुरेश लेंडे आणि पदाधिकारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here