मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी घेतला विद्यार्थ्यांचा क्लास! पवनार येथील जिल्हा परिषद शाळेला दिली भेट; तपासली विद्यार्थ्यांची गुणवत्ता

पवनार : येथील रहीम लेआऊट मधील जिल्हा परिषदेची शाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी अचाणक भेट देत पाहणी केली. यादरम्यान विद्यार्थ्यांचा उत्साह पाहुण मुख्याधिकाऱ्यांनी स्वत:हा येथील विद्यार्थ्यांचा क्लास घेतला. यावेळी विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यात आली अध्ययन स्तर वाढविण्या विषयी मार्गर्शन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, सूरज गोहाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धाचे श्री भोसले साहेब, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी, महेश बहेकर, ग्रामविकास अधिकारी, अजिनात डमाळे, ग्रामपंचायत सरपंच शालिनीताई आदमाने यांची प्रमुख उपस्थिती होती.

या शाळेतील काही खोल्यांची परिस्थिती अतिषय खराब झाली आहे. या शाळेत १२४ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्यामुळे या शाळेची पाहणी करावी अशी विनंती मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांना ग्रामपंचायत प्रशासनाने केली. त्यांच्या विनंतीला मान देत अधिकाऱ्यांनी अचानक जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. व तेथील परिस्थिती जाणून घेतली. तर मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी यावेळी चक्क विद्यार्थांचा क्लासच घेतला. या वेळेस विद्यार्थांनसोबत हितगुज करीत विद्यार्थांकडून माहिती जाणून घेतली तसेच विद्यार्थांना वाचण करायला सांगीतले त्याच धाडसाने शाळेतील विद्यार्थ्यांनी फाडफाड इंग्रजी वाचून दाखविली. त्यांचे हे धाडस पाहून सर्व अधिकारी अचंबित झाले व सर्व विद्यार्थ्यांचे कवतुक केले. पुढील कार्यासाठी प्रोत्साहनपर मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक वनमाला काळपांडे, मनिषा तडस, अर्चना इंगोले, संजय पवार, ग्रामपंचायत सदस्य रोशनी अवचट, शकुंतला नगराळे, नलिनी ठोंबरे, राजू बावणे, प्रमोद सरोदे, राम मगर, मुनेश्वर ठाकरे, जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक, पालक व गावातील नागरिक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here