पोलीस पेट्रोलपंप रद्द करण्यासाठी हस्तक्षेप करावा! खासदाराची पेट्रोलियम मंत्र्याकडे मागणी

वर्धा : शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील प्रस्तावित पोलीस पेट्रोलपंप रह करण्यासाठी तत्काळ हस्तक्षेप करावा याकरिता खासदार रामदास तडस यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री डॉ. हरदीप सिंग पुरी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील जनसामान्यांचा आवाज दिल्ली दरबारी पोहोचवला.

खासदार रामदास तडस यांनी प्रस्तावित पोलीस पेट्रोलपंपा संदर्भात. सविस्तरपणे माहिती मंत्री महोदयांना दिली व जनतेचा विरोध पेट्रोल पंपाला नसून नियोजित जागेला जनतेचा विरोध असल्याचे स्पष्टपणे सांगितले. केंद्रीय पेट्रोलियममंत्री डॉ. हरदीप सिंग पुरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याविषयी अहवाल सादर करून कार्यवाहीचे आदेश दिले. कुठल्याही परिस्थितीत भारतरल डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील नियोजित जागेवर पोलीस पेट्रोलपंप होऊ नये यासाठी भारतीय जनता पक्ष वर्धा जिल्हा ठाम असून नियोजित जागेवरील पेट्रोल पंप रह होइपर्यंत आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असे प्रतिपादन या वेळी खासदार रामदास तडस यांनी केले. यापूर्वी भाजपने पत्रपरिषदही घेतली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here