वैद्यकीय अधिक्षक म्हणून डॉ. पल्लवी वांदिले रुजू! वर्षभरापासून होते पद रिक्त

सेलू : गत वर्षभरापासून रिक्त असलेली येथील ग्रामीण रुग्णालयाची वैद्यकीय अधिक्षकाची जागा भरण्यात अली असून डॉ. पल्लवी किरण वांदिले (खेडीकर) यांनी (ता.१८) शुक्रवारला पदभार स्वीकारला आहेत.
याआधी त्या वर्धा सामान्य रुग्णालयात सहा वर्ष कार्यरत होत्या, तसेच त्यांनी सेलू तालुक्यातील दहेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सहा वर्ष व आंजी येथे दोन वर्ष सेवा दिलेली आहे.
विशेष म्हणजे सेलू येथील निवासी आणि सेवाग्राम रुग्णालयात अस्थी रोग तज्ञ डॉ. किरण वांदिले यांच्या त्या पत्नी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here