मालवाहूच्या धडकेत रुग्णवाहिका पलटली! पोलिसात तक्रार दाखल

वर्धा : आर्वीकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकेला मागाहून येणाऱ्या भरधाव वाहनाने धडक दिली. यात रुग्णवाहिका रस्त्यावर पलटली. सुदैवाने कुणालाही जीवीतहानी झाली नाही. हा अपघात आंजी (मोठी) गावात घडला.

१०२ क्रमांकाची एम.एच. 3२ जी. १३७ क्रमांकाची रुग्णवाहिका ही वर्ध्याकडुून आर्वीकडे जात असताना रुग्णवाहिका चालकाने गाडी पेट्रोलपंपाकडे वळविली असताना मागाहून भरधाव आलेल्या एम.एच.3२ क्यु. ५3५५ क्रमांकाच्या वाहनाने जबर धडक दिली. या धडकेत रूग्णवाहिका चालकाचे नियंत्रण सुटल्याने रूग्णवाहिका ट्री गार्डवर धडकल्याने रूग्णवाहिका रस्त्यावर उलटली. मात्र, यात कुणाचीही जीवीतहानी झाली नाही. यात रूग्णवाहिकेचे ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी खरांगणा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here