अतिक्रमण धारकांना मिळाली प्रधानमंत्री आवास योजनेत बांधकाम परवानगी! २८ लाभार्थ्याना दिली नगराध्यक्षानी बांधकाम परवानगीचे पत्र

0
179

मोहन सुरकार

सिंदी (रेल्वे) : पंतप्रधान आवास योजनेच्या मंजूर लाभार्थ्यांपैकी केवळ लाभाची जागा ही स्वमालकीची नसुन अतिक्रमीत असल्याच्या कारणाने वंचीत असलेल्या ७४ लाभार्थ्याना शासणाने नुकतीच मंजुरी दिल्यांने गुरुवारी (ता.८) पालीकेच्या वतीने नगराध्यक्षा संगीता शेंडे यांच्या हस्ते शहरातील २८ अतिक्रमण धारक लाभार्थ्याना प्रधानमंत्री आवास योजनेत बांधकाम करण्याच्या परवानगीचे पत्र देण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की, केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजेनेत सिंदी शहरातील ३०२ लाभार्थ्यांचे अर्जांना अंतीम मंजुरी मिळाली होती मात्र यापैकी काही अर्जदारांची रहीवासाची जागा ही स्वमालकीची नसुन अनेक वर्षांपासून अतिक्रमीत जागेवर राहने आहे आणि याच जागेवर त्यांनी योजनेतून हक्काचे घर बनविण्याचे स्वप्न रंगविले होते. मात्र अतिक्रमण केलेली जागा यात अडसर ठरत होती.
याबाबत शासनाकडे पाठपुरावा करुन शासनाच्या आदेशानुसार सिंदी शहरातील पंतप्रधान आवास योजनेतील एकुन ३०२ मंजुर लाभार्थ्यातील अतिक्रमन धारक अर्जदार लाभार्थ्यापैकी  ७४ लाभार्थी यांचे प्रकरणाला नुकतीच शासणाच्या वतीने मंजूरी देण्यात आली आहे. मात्र योजनेचा लाभ घेण्याकरिता नगर परिषद कार्यालयास एकूण ५२ लाभार्थ्यानीच प्रकरण सादर केलेले आहे. तर उर्वरित २२ लाभार्थीचे प्रस्ताव कार्यालयास प्राप्त झालेले नसल्यांची माहीती नगर पालिकेच्या बांधकाम विभागातर्फे देण्यात आली.

सादर प्रकरणापैकी गुरुवारी (ता. ८) एकूण २८ अतिक्रमित लाभार्थाना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत बांधकाम परवानगी प्रत पालिकेच्या नगराध्यक्षा संगीता शेंडे यांचे हस्ते पालिका सभागृहात देण्यात आली. यावेळी सेलु नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी तथा सिंदी नगर पालिकेची मुख्याधिकारीपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या कांचन गायकवाड, उपाध्यक्षा वंदना डकरे, नगसेविका सुमिना पाटील,जयना बोंगाडे,चंदा बोरकर, नगसेवक प्रकाशचंद्र डफ, शेख अकिल शेख हमीद, रमेश उईके तसेच शहरातील घरकुल लाभार्थी, शहरातील प्रतिष्टीत नागरीक व नगर परिषद कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here