महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानावर आधारीत सायकल रॅली आयोजन

सिंदी (रेल्वे) : जिल्हा प्रशासनाच्या वतीने नगर परिषद कार्यालयामार्फत सिंदी शहरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंती निमित्त आयोजित सप्ताह कार्यक्रमात आज शनिवारी (ता. १०) माझे कुटुंब-माझी जबाबदारी या अभियाना सबंधि जन-जागृती मोहीम चित्ररथ-सह सायकल रॅलीच्या माध्यमातून राबविण्यात आली.
रॅलीची सुरवात साई मंदिर परिसरातून पालीकेच्या अध्यक्षा संगीता शेंडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. यावेळी उपध्यक्षा वंदनाताई डकरे, बांधकाम सभापती आशीष देवतळे, नायब तहसिलदार किशोर शेंडे, नगरसेवक विलास तळवेकर, अकील शेख, जयना बोंगाडे, स्विकृत नगरसेवक ओमप्रकाश राठी, सुधाकरराव घवघवे,  तलाठी चंदनखेडे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कल्याण सानप, पोलिस प्रशासनाच्या वतीने हवालदार इवनाथे आपल्या सहकार्यासह तसेच रॅलीचे मुख्य आकर्षण असलेले सायकलस्वार शहरातील साई क्रीडा मंडळाचे खेळाडू अविनाश मुठाळ आपल्या १० साथीदारासह रॅली मध्य सहभागी झाले होते.

जनजागृती रॅलीची सुरवात साईमंदिर बसस्टँड चौक, सोनामाता मंदिर, कांढली रोड, टिळक शाळा ते नंदी चौक, असे आयोजन करण्यात आले होते.
नंदी चौकात माझे कुटुंब माझी जबाबदारी या विषयावर आधारीत रांगोळी काढण्यात आली होती. तेथून रॅली बसस्टँड चौक, मस्तानशा चौक, कवठारोड, मातामाय मंदिर, राजेंद्र शाळा, रेल्वेस्टेशन, रेल्वे गेट ते नगर परिषद प्रांगनात रॅलीचा समारोप करण्यात आला.

रॅली चे आयोजन नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी एस. बी. महाजन यांच्या नेतृत्वाखाली इतर कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. रॅलीच्या समोरोप कार्यक्रमाचे संचालन नेहरू विद्यालयाचे शिक्षक अनिल खोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र बावीस्कर यांनी केले. यावेळी सायकल-स्वारांसाठी अल्पोपहार व चहापान कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here