

वर्धा – रोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रभावित झालेल्या घटकांना लॉकडाऊनच्या काळामध्ये आधार फाउंडेशन ने जी मदत केली त्या मदती ची दखल घेऊन पालकमंत्री सुनीलजी केदार,जिल्हाधिकारी श्री. विवेकजी भिमनवार यांच्यावतीने स्वातंत्र्यदिनी उपविभागीय कार्यालयामध्ये उपविभागीय अधिकारी श्री चंद्रभानजी खंडाईत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करून आधार फाउंडेशन ला सन्मानित करण्यात आले.
कोरोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आले होते त्यामुळे रोज मजुरी करणारे अनेक कुटुंब बिकट परिस्थितीचा सामना करीत होते. कित्येक कुटुंबाची त्याकाळी चूल पेटली नव्हती तेव्हा *एक हात मदतीचा* या उपक्रमाअंतर्गत गरजू लोकांना धान्य ,किराणा किट ,भाजीपाला, सॅनिटायझर व मास्क चे वाटप लॉकडाऊन च्या काळामध्ये करण्यात आले होते.
गेल्या अनेक काही वर्षांपासून हिंगणघाट शहर व परिसरामध्ये आधार फाउंडेशन विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करीत लोकाभिमुख झाले असून समाजामध्ये सकारात्मक संदेश देऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य आधार फाउंडेशन करीत आहे समाजाच्या पाठीशी सदैव उभे राहुन सामाजिक बांधिलकी जोपासत कार्य अखंड चालू राहील व गरज पडेल तेव्हा तेव्हा आधार फाउंडेशन समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील असा विश्वास व्यक्त करीत आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री अतुल वांदिले, कार्यकारी अध्यक्ष श्री पराग मुडे, श्री मधुकर चाफले, जगदीश वांदिले, प्रा. गजानन जुमडे यांनी आधार फाउंडेशनच्या वतीने हा सन्मान स्वीकारला .
समाजातील सर्व स्तरातून आधार फाऊंडेशनचे अभिनंदन होत आहे.
——————————————————————————–
यापुढेही सामाजिक बांधिलकी जोपासत आधार फाऊंडेशन अविरहतपणे कार्य करीत राहील .
*अतुल वांदीले*
संस्थापक अध्यक्ष आधार फाऊंडेशन