चाकूच्या धाकावर सलून व्यावसायिकास तिघांनी लुटले! रोख रकमेसह मोबाईल हिसकावला

वर्धा : सलून दुकान बंद करून दुचाकीने घरी जात असलेल्या सलून व्यावसायिकास रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या खिशातील रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण ७५८० रुपयांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून नेला. ही घटना केळझर ते दहेगाव गो. रस्त्यावर 3 रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

सुदेश रामदास पिस्तुलकर (रा. दहेगाव गोसावी) याचे मास्टर कॉलनी सावंगी मेघे परिसरात सलूनचे दुकान आहे. दररोज प्रमाणे तो रात्री ८.3० वाजताच्या सुमारास दुकान बंद करून दिवसभराच्या कामाचे पैसे घेऊन एम. एच. 3२ ए. एफ, ४२१८ क्रमांकाच्या दुचाकीने दहेगाव येथे घरी जात असताना रस्त्यात असलेल्या गजानन महाराज मंदिरजवळ दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तिघांनी दुचाकीला अडवून चाकूचा धाक दाखवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सुदेशच्या खिशात असलेले ४५८० रुपये जबरीने काढून घेत मोबाईल हिसकावून घेतला. याप्रकरणी सुदेशने सेलू पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here