
वर्धा : देवदर्शनासाठी गेलेल्या व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचा गोफ हिसकावून नेल्याची घटना महाकाली धरण परिसरात घडली. याप्रकरणी खरांगणा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
अरविंद उकंड खवशी हे पत्नीसह महाकाली येथे दुचाकीने दर्शनासाठी गेले होते. सायंकाळच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना रस्त्यात अडवून चाकुचा धाक दाखवत अरविंदच्या गळ्यातील ६० हजार किंमतीचा सोन्याचा गोफ हिसकावून नेला. याप्रकरणी अरविंद खवशी यांनी खरांगणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास खरांगणा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष हेगावकर करीत आहे. आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.


















































