कंटेनर अपघातात 40 जनावरांचा दुर्दैवी मृत्यू! डाक पार्सल लिहिलेल्या ट्रेलर मध्ये अवैद्यरित्या कत्तलखाण्यात जाणाऱ्या जनावरांची वाहतूक

सायली आदमने
वर्धा : नागपुर अमरावती महामार्ग सावळी (खुर्द) फाट्याजवळ टकंटेनर क्रमांक HR 55 S-8795 अमरावतीकडे अवैधरित्या कत्तलखाण्यात जनावरे घेऊन जात असताना वाहनाचा वेग भरधाव असल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाला यात जवळपास 70 जनावरांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत असून 40 जनावरांचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या 11 जनावरांवर उपचार करण्यात येत असून कंटेनर मधून जनावरे काढण्याचे कार्य अजूनही सुरू असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

कंटेनर पलटी होताच चालक घटनास्थळा वरून पसार झाले. या कंटेनर मध्ये अवैधरित्या कत्तलखाण्यात जनावरे घेऊन जात होते. अपघातात 40 जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सकाळी आठ वाजताच्या सुमारास कारंजा पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत यांनी आपल्या सर्व चमूसह घटनास्थळावर पोहचून कारवाईला सुरुवात केली.

या अपघातात जखमी झालेल्या जनावरांना पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टरकडून उपचार करण्यात आला कंटेनर मध्ये मृत पावलेला जनावरांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांकडून करेन मशीन द्वारे बाहेर काढण्यात आले.

सदर घटनेत मृत पावलेल्या 40 जनावरांना बाजूला खड्डा खोदून अंत्यविधी केला जाणार आहे व 11 जखमी झालेल्या जनावरांना वेगळ्या बाजूला ठेवण्याची व्यवस्था केली आहे. जखमी झालेल्या जनावरांना पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत व डॉक्टरांनी मार्फत प्राथमिक औषधोपचार करण्यात आला व त्यांच्या करिता चाऱ्याची व्यवस्था केली.

राष्ट्रीय महामार्गवर अनेकदा अवैधरित्या जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या अपघात घडले आहे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने कत्तलखाण्यात आळा बसलेला नाही. मोठ्या प्रमाणात अवैधरित्या जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहन भरधाव वेगाने चालत असल्याने अपघाताची संख्येत वाढ होत आहे. आज झालेल्या अपघातात 40 जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पशु प्रेमी हळहळ व्यक्त करीत आहे.

या कंटेनर मध्ये कोंबून जनावरे नेत असून या कंटेनर समोर डाक पार्सल असे लिहिले असून यातून अवैध वाहतूक केल्या जात असल्याचे आता उघडकीस आले आहे. जवळपास कंटेनर मधून जनावरे काढण्यासाठी तब्बल 9 तासानंतर जनावरे बाहेर काढण्यात यश आले मात्र यातील अनेक जनावरांचा मृत्यू झाला होता.

यावेळी पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत, साहाय्यक पोलीस निरीक्षक बबन मोहदुळे, उपनिरीक्षक सचिन मानकर, किशोर कडू, नितेश वैद्य, पवन लव्हाळे, प्रशांत मानमोडे, मनोज सूर्यवंशी,सूरज बावरी ,डॉ. मुकीनंदा जोगेकर, डॉ राजेंद्र घुमडे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here