
वर्धा : कुठे चालला असे विचारले असता काहीच बोललो नाही म्हणून आरोपीने चाकूने हल्ला केला. त्यात 22 वर्षीय युवक गंभीर जखमी झाला. ही घटना शहरातील गोंडप्लाट येथे रात्रीच्या दरम्यान घडली. प्राप्त माहितीनुसार, अक्षय मनोज सोनटक्के (वय 22) रा. गोंडप्लाट, वर्धा हा त्याच्या मित्रासोबत शिवाजी चौकातून रात्री दरम्यान घराकडे पायदळ येत होते.
दरम्यान, आरोपी अमोल गेडाम रा. इतवारा बाजार, वर्धा हा रस्त्यात भेटला. आरोपीने कुठे चालला असे विचारले असता त्यास काहीच बोललो नाही. त्यानंतत आरोपीने अडवून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर चाकूने जीव घेण्याच्या उद्देशाने वार केला. मात्र, अक्षय सोनटक्के याने चुकविण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या डोक्यावर मार लागला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर अक्षय हा घटनास्थळावरून पळला असता आरोपीने त्याचा पाठलाग केला व जीवाने मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी प्रसार झाला. याप्रकरणी अक्षय मनोज सोनटक्के याच्या तक्रारीवरून वर्धा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
















































